• Mon. Nov 25th, 2024
    कोकणच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्षाची घोषणा; नोंदणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे अर्ज

    मुंबई: निसर्गरम्य, जैव संपत्तीचा खजिना असूनही कोकणला अविकासाचा शाप लागला आहे. स्वातंत्र्यापासून कोकणी माणूस उपेक्षितच राहिला आहे. विकासापासून वंचित राहिला आहे, कोकणातील माणसाची राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व कोकणातील युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे मुख्य उद्दिष्ट ठेवून नवीन ‘कोकण प्रादेशिक पक्ष’ या नव्या राजकीय पक्षाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.
    उरणच्या शाळेत विद्यार्थ्यांना आसाराम बापूची पुस्तके वाटली, पालकांनी विचारलं तर म्हणे ‘आम्हाला वरून ‘आदेश!’
    कोकणातील कोकणी माणसाचा आवाज बुलंद होण्यासाठी आणि त्यांच्या समस्या या शासन दरबारी मांडण्यासाठी राजकीय पक्षांना अपयश येत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आणि उच्चशिक्षित मंडळी एकत्र येत कोकण प्रादेशिक पक्ष या नावाने नवीन पक्ष स्थापन केला जात आहे असल्याची माहिती शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी करण्यात आली. २७ डिसेंबर रोजी पक्षाच्या नोंदणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत.

    ॲड. ओवेस अन्वर पेचकर (संयोजक), ॲड. वैभव वसंत हळदे (सह संयोजक), ॲड. शुभम सुरेश उपाध्याय (सरचिटणीस), सीए नावीद अब्दुल सईद मुल्ला (खजिनदार) या पदाधिकाऱ्यांचा कमिटीमध्ये समावेश आहे. कोकण प्रादेशिक पक्षाची केंद्रीय कमिटी १० ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत कोकणाचा दौरा करणार आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा कमिटींची नियुक्ती केली जाणार आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोकणातील नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगरमधील जिल्हा कमिटी निवडल्या जाणार आहेत.

    पदाचा मोह नाही, बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सत्ता सोडण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान

    कोकण प्रादेशिक पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत १२ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्री पर्वतरांगावर व समुद्रात बांधलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनापासून रोजगार, पर्यटन, विकास ते कोकणी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची वचने पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed