• Sat. Sep 21st, 2024

रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी जाण्याची उत्सुकता; मात्र बाप-लेकासोबत वाटेतच विपरीत घडलं अन्…

रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी जाण्याची उत्सुकता; मात्र बाप-लेकासोबत वाटेतच विपरीत घडलं अन्…

जळगाव: गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याने पिता-पुत्राला घरी परतण्याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार दोघेही दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच दोघांसोबत विपरीत घडलं. जळगाव जिल्हा रुग्णालयातून निघाल्यानंतर वाटेतच जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ उड्डाणपूलावर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना दुचाकीवर मागे बसलेले वडील हे अचानक खाली पडल्याने त्यांच्या अंगावरुन वाहन गेले. यात ते जागीच ठार झाले तर या अपघातात दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची सहल निघाली, शिक्षक आणि चालक मद्यधुंद अवस्थेत, तेवढ्यातच बसचा अपघात अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ शेख ईस्माईल खाटीक (७८, रा. पारोळा) असे मयत पित्याचे नाव असून त्यांचा मुलगा दुचाकीचालक अस्लम शेख युसूफ खाटीक (४४, रा. पारोळा) हा जखमी झाला आहे. पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक आणि अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळे तपासणी करण्यासाठी आलेले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयातच दाखल होते. रुग्णालयातून शुक्रवारी त्यांना डिचार्ज मिळाला.

त्यानंतर अस्लम शेख युसुफ खाटीक त्यांचे वडील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्यासोबत दुपारी १ वाजता ते दुचाकीने घरी पारोळा येथे जाण्यासाठी निघाले. अस्लम शेख हे दुचाकी चालवत होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवर मागे बसलेले युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला. ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. तर दुचाकीस्वार अस्लम शेख हे जखमी झाले.

ही हाईट सगळ्यांना जमायची नाही, सायकल वाटपासाठी आलेल्या सुप्रिया सुळेंचा कर्मचाऱ्यांना सल्ला

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनीही रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. डोळ्यादेखत पित्याचा करुण अंत पाहून अस्लम यांना मोठा मानसिक धक्का बसला. वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे नि:शब्द झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed