• Sun. Aug 9th, 2026
    संतापजनक! कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार, पुणे हादरलं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: आईच्या प्रियकरासह तिघांनी १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपींमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे.

    या प्रकरणी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील एका विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२३ या कालावधीत घडला आहे.

    Jammu Kashmir : काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; ४ जवान हुतात्मा, तीन जखमी

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक जण पीडितेच्या कुटुंबातील आहे, तर एक जण आईचा प्रियकर व एक जण पीडितेचा मित्र आहे. पीडित मुलीची आई दिवसभर धुण्याभांड्यांची कामे करते. तिच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे. पीडित मुलगी घरी असताना, आईच्या प्रियकराने घरी येऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या मित्राने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडिता घरी एकटीच असताना तिच्या कुटुंबातीलच एका अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

    असा झाला प्रकार उघड

    पीडित मुलगी शाळेत असताना तिच्या मोबाइलमध्ये वर्गातील मैत्रिणींनी पीडितेचे आणि तिच्या मित्राचे काही फोटो पाहिले. त्यानंतर मैत्रिणींनी शिक्षिकेला त्याची माहिती दिली. शिक्षिकेने अधिक चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला, अशी माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली.

    योग्य गुन्हा दाखल करणार, अंबादास दानवे जखमी प्रिया सिंहच्या भेटीसाठी इन्फिनिटी रुग्णालयात

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed