मात्र, काही शिक्षक तर समोरच्या मुलांचं वय न पाहता कठोर शिक्षा करत असतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरामध्ये घडली असून नववीत शिकणाऱ्या मुलीला गणिताचे उत्तर चुकले म्हणून बेदम मारहाण केलेल्या शिक्षेकेवर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरी गृहपाठ म्हणून दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला खासगी क्लासच्या शिक्षकेने बेदम मारहाण केल्याची घटना घणसोलीत घडली आहे. घणसोली गावात राहणारी विद्यार्थिनी घणसोली सेक्टर ५ येथील ही विद्यार्थीनी खासगी क्लासला जात होती. या विद्यार्थिनीचे शिक्षिकेने गृहपाठ म्हणून दिलेले गणित चुकल्याने तीला बांबू आणि लाकडी फळीने बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीमुळे शरीरावर अनेक ठिकाणी सूज आल्याने सदर प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिक्षिका शकीला अन्सारी विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास सुरू आहे. मात्र, शहरामध्ये क्लासच्या शिक्षकेने बेदम मारहाण केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून अशा निर्दयी शिक्षकेला शिक्षा झाली पाहिजे अशी चर्चा रंगली आहे.
