• Wed. Nov 13th, 2024

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द, कोणत्या गाड्या कॅन्सल?

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द, कोणत्या गाड्या कॅन्सल?

    पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.

    अप उपनगरीय गाड्या रद्द करणे…

    १. पुण्याहून लोणावळ्यासाठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.

    २. पुण्याहून लोणावळ्यासाठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.

    ३. पुण्याहून लोणावळ्यासाठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.

    ४. शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.

    ५. पुण्याहून लोणावळ्या करीता 16.25वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.

    ६. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

    ७. पुण्याहून लोणावळ्यासाठी 18.02 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01572 रद्द राहील.

    डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करणे…

    १. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.

    २. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

    ३. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.

    ४. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.

    ५. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.

    ६. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

    ७. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 19.35 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01571रद्द राहील.

    मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन

    गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ०३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल.

    वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed