• Sat. Sep 21st, 2024
यंदाच्या दिवाळीत साईंच्या चरणी कोट्यवधींचं दान, १० दिवसांमध्ये तब्बल १७ कोटी अर्पण

अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबा मंदिरांच नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. त्यामध्ये यावेळी दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहा दिवसांमध्ये तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकं भरघोस दान प्राप्त झालं आहे.

१० नोव्‍हेंबर ते २० नोव्‍हेंबर दरम्यान, असेलल्या दिवाळीच्या सुट्टीत असंख्य साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. या दहा दिवसांच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपात तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकं भरघोस दान प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली. त्यामुळे या दहा दिवसांत साईबाबांच्या चरणी दररोज पावणे दोन कोटी प्राप्त झाल्याचं दिसून आलं आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्ती वय ६० वर्ष करण्याचा शिंदेंचा विचार
या दानामध्ये कोणकोणत्या स्वरूपातील देणग्यांचा समावेश आहे. याची सविस्तर माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी दिली. ते म्हणाले की, दिनांक १० नोव्‍हेंबर ते दिनांक २० नोव्‍हेंबर या कालावधीत रुपये १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ प्राप्‍त झाले आहे. यामध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये ७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ रुपये दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटर ३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी २ कोटी ३१ लाख ८५ हजार ६००, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर ३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३, तर सोने ८१० ग्रॅम रक्‍कम रुपये २२ लाख ६७ हजार १८९

चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्‍कम रुपये ४ लाख ४९ हजार ७३१ यांचा समावेश आहे. या अगोदर मार्च महिन्यात रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. या तीन दिवसाच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपातीत तब्बल ४ कोटी ९ लाख रुपयांचं दान प्राप्त झालं होतं. त्यात १ कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये दानपेटीतून, ७६ लाख १८ हजार १४३ रुपये देणगी काऊंटद्वारे, तर डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक, डीडी, मनी ऑर्डर यामाध्यमातून तब्बल १ कोटी ४२ लाख ५२ हजार ८१२ रुपये प्राप्त झाले होते.

मी पुन्हा येईन! IPLमध्ये पांड्याची घरवापसी; मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये मोठी डील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed