• Sat. Sep 21st, 2024

फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी

फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपूर: आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीससह विठ्ठलाची पूजा केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुला येथील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेल्या १५ वर्षांपासून वारी करत आले आहेत.

अनेक वर्षांपासून चालत अलेल्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशीला आज पहाटे उपमुख्यमंत्री यांनी सहपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे एक दिवसआधीच म्हणजेच बुधवारीच पंढरपुरात दाखल झाले.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, मंत्रोपचारासह पूजा करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान यावेळी नाशिक जिल्ह्यातील घुगे दाम्पत्याला मिळाला. पूजेनंतर मंदिर समितीकडून देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला.

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते संपन्न

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed