• Mon. Nov 25th, 2024
    कुटुंब कार्यक्रमासाठी बाहेर निघाले; अचानक बिबट्याची दुचाकीवर झेप, पत्नीच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

    पुणे: आंबेगाव तालुक्यातील पेठ येथून चांडोली येथे चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने या परिसरात बिबट्याची दहशत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाले असून पत्नी यातून बचावली आहे. भरत गोविंद राऊत (५३) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार बुधवार दि. १५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
    भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नविन खातं उघडलं असावं,रामलल्लाच्या मोफत दर्शनावरुन राज ठाकरेंचा जोरदार टोला
    मिळालेल्या माहितीनुसार, भरत गोविंद राऊत आणि त्यांची पत्नी रचना भरत राऊत आणि मुलगा समर्थ भरत राऊत हे भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून रात्री ९ वाजता पेठ येथून चांडोली येथे चुलत भाऊ राहुल रेवजी राऊत यांच्या घरी चुलत्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते चांडोली फाटा येथे आले असताना रस्त्याच्या बाजूकडे उसातून अचानक बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी या हल्यात बिबट्याने भरत यांच्या पायाला पंजा मारल्याने बिबट्याने भरत राऊत यांच्या पायावर पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत.

    जरांगेंची कोल्हापुरात सभा, दोन लाख मराठा बांधव उपस्थित राहण्याचा अंदाज

    मात्र प्रसंगावधान दाखवत त्यांनी दुचाकी पळवली. मात्र तरीही बिबट्या त्यांचा पाठलाग करत होता. मात्र मागे बसलेल्या भरत यांच्या पत्नीने त्या पाठलाग करणाऱ्या बिबट्याच्या अंगावर पर्स फेकून मारली तेव्हा बिबट्या थोडा दबकला. तरी देखील बिबट्या काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग करत होता. मात्र नंतर त्यांच्या मागून एका मोठी गाडी आल्याने बिबट्या त्या गाडीच्या प्रकाशाने निघून गेला. त्यानंतर भरत यांनी याबाबत त्यांचा भाऊ राहुल राऊत याला फोन करून घटनेची माहिती दिली. त्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेत भरत यांना मंचर येथील रुग्णालयात दाखल केले. घडलेल्या घटनेबाबत वन विभागाला कळवण्यात आले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *