• Sat. Sep 21st, 2024
Dhule-Mumbai Express: धुळे – मुंबई एक्सप्रेस सुरु, ‘असे’ आहे वेळापत्रक, ‘या’ स्टेशनवर थांबणार

म. टा. वृत्तसेवा, नाशिक : धुळे-दादर या दररोज धावणाऱ्या नवीन एक्स्प्रेसला सोमवारपासून प्रारंभ झाला. मात्र, मनमाडहून तीन दिवस सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस आता धुळे-दादर एक्स्प्रेस म्हणून रोजच धुळ्याहून सुटणार असल्याने गोदावरीने अप-डाऊन करणारे चाकरमाने, नोकरदार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली.

या नवीन गाडीला खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे रेल्वे स्थानकातून सकाळी साडेसहा वाजता हिरवा झेंडा दाखविला. धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, प्रवासी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. मध्य रेल्वेने पुणे-नाशिक-भुसावळ ही थेट पुण्याला जाणारी गाडी दौंड-मनमाडमार्गे अमरावतीला नेण्यास सुरुवात केल्याने नाशिककरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केला. आता धुळे-मुंबई गाडी सुरू करून दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.

मनोज जरांगेंची ताकद वाढली, वातावरणनिर्मितीसाठी मराठा संघटना कामाला लागल्या; ठाणे, कोकणात सभांची तयारी?
…असे आहे वेळापत्रक

दादर-धुळे दैनिक एक्स्प्रेस (११०११) ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी बारा वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचेल. धुळे-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (११०१२) ही गाडी धुळ्याहून दररोज सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी दुपारी १४.१५ वाजता पोहोचेल.

…या स्थानकांत थांबणार

दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड या रेल्वे स्थानकांत या गाडीला थांबा असेल. या गाडीला १६ डबे असून, त्यात एक वातानुकूलित चेअर कार, १३ नॉनएसी चेअर कार (पाच आरक्षित आणि आठ अनारक्षित), तर एक जनरल सेकंड क्लासच्या डब्याचा समावेश आहे.

धुळ्याहूनच गाडी आली फुल्ल होऊन!

मनमाड रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी धुळ्याहून आलेली ही गाडी प्रवाशांनी गच्च भरून आल्याने मनमाडसह लासलगाव, निफाड, नाशिक या स्थानकांवरून बसलेल्या प्रवाशांना या गाडीत रेल्वेत जागाच मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. मनमाड, लासलगाव, निफाडहून होणारी गर्दी पाहता या गाडीला एक-दोन डबे जोडून उपयोग नाही, तर जास्त डबे जोडले जावेत, अशी मागणीही अनेकांनी केली.

सोयीची गोदावरी मनमाडहून सुटत नाही, याचे वाईट वाटते. धुळे-दादर एक्स्प्रेसमध्ये प्रवासी व चाकरमान्यांना जागा न मिळणे, पासधारकांसाठी स्वतंत्र बोगी नसणे, गाडी उशिरा आल्यास नोकरदारांना वेळेवर पोहोचण्यास उशीर होणे या समस्या आहेत.

-नरेंद्र खैरे, प्रवासी संघटना

भारत-न्यूझीलंड सामन्यात टॉस जिंकल्यास संघ प्रथम गोलंदाजी की फलंदाजी निवडणार? जाणून घ्या कसं आहे पिच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed