• Mon. Nov 25th, 2024

    नागपूर हादरलं, भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री वादाचा भडका, आरोपी नेमके गेले कुठं?

    नागपूर हादरलं, भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री वादाचा भडका, आरोपी नेमके गेले कुठं?

    नागपूर : नागपूर जिल्हातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे नागपूर ग्रामीण सरचिटणीस होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डोंगरे हे भाजप समर्थित उमेदवार म्हणून निवडून आले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजू डेंगरे हे पाचगाव येथे ढाबा चालवतात. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी डोंगरे यांच्यावर लाठ्या आणि दगडांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी काउंटर मधील पैसे आणि मृतकाची कार घेऊन घटनास्थळाहून पलायन केले. मात्र, नंतर आरोपीच्या कारला अपघात झाला अणि नंतर आरोपींनी विहीरगाव येथील नगनदीच्या पुलाजवळ कार तिथेच सोडून तिथूनही पळ काढला. राजू डेंगरे यांच्या हत्येची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सध्या कुही पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

    स्वाभिमान गहाण ठेवला! आजारी अजितदादांना अंथरुणातून उठून दिल्लीत अमित शाहांना भेटायला जावं लागलं: संजय राऊत
    राजू डेंगरे हे नागपूर ग्रामीणचे सरचिटणीस आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही राजू डेंगरे विजयी झाले होते. त्याच्या हत्येमागचे खरे कारण काय आहे हे अद्याप कळू शकले नाही. चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती की अन्य काही कारण होते याचा पोलीस तपास करत आहेत. डेंगरे यांच्या हत्येप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

    लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोदींसोबत येणार; रवी राणा यांचा दावा

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *