– मधुर फूड प्लाझा येथे प्लास्टिक डब्यांमध्ये साठविलेल्या श्रीखंडाच्या पॅकिंगची तपासणी.
– तपासणीत लेबलवर बॅच नंबर, उत्पादनाची तारीख तसेच एक्स्पायरी डेट आढळली नाही.
– उत्पादन कोठे व कोणी केले याबाबतचाही उल्लेख नाही.
– ६१.५ किलोचा श्रीखंडसाठा अन्न सुरक्षा अधिाकरी प्रमोद पाटील यांनी केला जप्त.
– साठ्याची किंमत १८ हजार ४५० रुपये
एमआयडीसीत तेल पकडले
– सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसीतील ईगल कार्पोरेशन येथे धाड
– तपासणीअंती खुले खाद्यतेल, पूर्ण वापर केलेल्या डब्यांमध्ये खाद्यतेलाची विक्री स्पष्ट.
– भेसळीच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्याकडून नमुना जप्त.
– एक लाख ९३ हजार ५५८ रुपयांचे खुले खाद्यतेल जप्त
जप्त केलेले तेल
रिफाइनड् सोयाबीन तेल (खुले) – ५३ कॅन – किंमत ९३,९३५
सोयाबीन तेल पूर्ण वापर केलेले डबे – ६१३.४ किलो – किंमत ६२ हजार ५६६
रिफाइनड् पामोलिन तेल पूर्ण वापर केलेले २८ डबे – ४१८.४ किलो – किंमत ३७ हजार ५५६