मुंबई, दि. 1 : राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत विविध राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर) साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार अनू मलिक, राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच निमंत्रित उपस्थित होते.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमामुळे विविध राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंस्कृती, लोक संगीत व लोककला याबाबत माहिती मिळते. देशातील सर्व राजभवनांमध्ये इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला पुष्टी मिळत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन करुन देशाला सांस्कृतिक एकात्मतेने जोडल्याचे नमूद करून आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देश एकात्म भावनेने जोडला गेला आहे, याचे श्रेय आद्य शंकराचार्य यांच्या द्रष्टेपणाला जाते, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कमी वेळात विविध राज्यांची लोकगीते व नृत्ये शिकून राजभवन येथे सादर केल्याबद्दल राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्रे देऊन गौरवित केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी हरियाणा, पंजाब (गिद्धा लोकनृत्य), केरळ (मोहिनीअट्टम), तामिळनाडू (कारगट्टम) व कर्नाटक येथील लोकनृत्य सादर केले; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी भांगडा, कोलकली नृत्य (लक्षद्वीप) व पुडुचेरीचे गरादी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संगीतकार अनू मलिक, ‘बामू’चे प्रकुलगुरु प्रो. श्याम शिरसाठ, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी नितीन प्रभुतेंडुलकर तसेच ‘बामू’चे संपर्क अधिकारी मुस्तजीब खान यांचा सत्कार करण्यात आला.
Foundation day of Haryana, Karnataka, Kerala, Punjab and TN celebrated in Maharashtra Raj Bhavan
Mumbai, 1st Nov : The Foundation Day of the states of Haryana, Karnataka, Kerala, Punjab and Tamil Nadu was celebrated in Maharashtra Raj Bhavan in presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Wed (१ Nov). The Union Territory Formation Day of Andaman and Nicobar, Chandigarh, Delhi, Lakshadweep and Puducherry was also celebrated for the first time at Maharashtra Raj Bhavan.
The Foundation Day programme was organised as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.
Addressing the gathering, Governor Ramesh Bais said celebration of the foundation days of other states and Union Territories in the Raj Bhavans across the country has created awareness about the culture and traditions of other States, thereby strengthening the cause of unity and national integration.
The Governor said the foundation of four dharma peethas by Adi Shankaracharya in different corners of the country united the nation from Kashmir to Kanyakumari through the bonds of shared culture.
The Governor complimented the students of the Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), Chhatrapati Sambhajinagar and the Smt. Nathibai Damodar Thackersey (SNDT) Women’s University for their excellent presentation of folk songs and folk dance of various states and union territories. All the students were presented with the certificate of participation by the Governor.
The Governor felicitated music composer Anu Malik, Pro Vice Chancellor of BAMU Prof Shyam Shirsath, Registrar of SNDT Women’s University Vilas Nandavadekar, Director Students Welfare of SNDT Women’s University Nitin Prabhutendulkar and Liaison Officer of BAMU Mustjeeb Khan on the occasion.
Secretary to the Governor Shweta Singhal delivered the welcome address, while the Comptroller of the Governor’s Households Arun Anandkar proposed the vote of thanks.
0000