• Mon. Nov 25th, 2024
    आता वीजचोरांना बसणार चाप; वीजचोरी कळवा, १० टक्के बक्षीस मिळवा, महावितरणचा उपक्रम

    नागपूर: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’ हा उपक्रम जाहीर केला आहे. यात वीजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
    ८५ वर्षीय विष्णू पवार जरांगेंच्या साथीला, सोलापूरमध्ये उपोषण, सरकारविरोधात एल्गार करत म्हणाले….
    भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फेरफार करून होणाऱ्या वीजचोऱ्या रोखण्यासाठी महावितरणने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे नागरिकांनी या पुढे येऊन वीजचोरीची माहिती कळवावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. वीजचोरी कळवणाऱ्या नागरिकांनी वीजजोरीची माहिती लेखी, इमेल अथवा तोंडी कळवावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    तुमची तब्येत व्यवस्थित असणं समाजासाठी महत्वाचं आहे; Sambhajiraje यांचा जरांगेंना फोन

    वीजचोरीची माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून या सुविधेचा लाभ घेत जागरूक नागरिकांनी वीजचोरी रोखण्यात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महावितरणच्या संकेतस्थळावरून अथवा मोबाईल ऍपवरून वीजचोरीची माहिती देण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना अवगत असलेल्या वीजचोरीची माहिती महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी कार्यालये अथवा फिरते पथक यांना केवळ लेखी, ईमेल अथवा तोंडी कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed