मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची उद्घाटने आणि भेटीगाठींना वेग येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन; तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत लाभ दण्यात येणार आहे. त्याचबरोबर निळवंडे धरणाचे जलपूजन करून ते कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.
या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास मोदी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. साईबाबांच्या समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी ३.१५च्या सुमारास मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे सात हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील, अशी माहिती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

साईबाबांचे दर्शन घेऊन मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या (८५ किमी) कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. यामुळे पाण्याचे वाहिन्यांचे वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) १८२ गावांना याचा लाभ होईल. या धरणासाठी सुमारे पाच हजार १७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.
दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन
शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा नवीन दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सुविधांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लॉक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे .