• Sat. Sep 21st, 2024
ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! ड्रग्ज बनवायचा फॉर्म्युला कुणी दिला? पोलिसांनी सांगितलं सत्य

पुणे: ललित पाटील ड्रग्स तस्करी संदर्भात अनेक नाव पुढे येत आहे. या माध्यमातून राज्यात सुरू असलेले ड्रग्स रॅकेटचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागला आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, सह आरोपी अभिषेक बलकवडेला अटक झाली असताना ललित पाटीलची वकिली करणारी प्रज्ञा कांबळे आणि मैत्रीण अर्चना निकामला अटक केले आहे. यांच्या चौकशी दरम्यान अनेक खुलासे उघड झाले आहेत.
अखेर ‘त्या’ डोंबिवलीतील हाणामारीचे कारण समोर; दोघांना ताब्यात घेतलं, जाणून घ्या नेमकं प्रकरण…
आज या ड्रग्स तस्करी प्रकरणात अटकेत असलेले रहीम अन्सारीला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रहीम अन्सारीच्या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली. रहीम अन्सारी याकडे ड्रग्स तस्करीचे मोठी जबाबदारी या नेक्सएक्स मध्ये होती. अरविंद लोहारे हा ललित पाटील सोबत २०२० मध्ये येरवडा कारगृहात ड्रग्सची तस्करीमध्ये अटक होता. अरविंद लोहारे हा केमिकल इंजिनीयर होता. त्याला ड्रग्स बनवण्याचा फॉर्म्युला माहीत होता.

भारतातले विविध धर्मांचे लोक हिंदूच होते, परकीय आक्रमणांमुळे धर्मांतर झालं, फडणवीसांचा दावा

हा फॉर्म्युला भूषण पाटीलपर्यंत पोचण्यासाठी त्याने मोठी युक्ती लढवली. तारखेला भेटण्यासाठी भूषण पाटील सोबत अभिषेक बलकवडे येत होता. यादरम्यान किंवा फोनद्वारे ड्रग्स बनवायचा फॉर्म्युला भूषण पाटील पर्यंत पोहचला होता. त्यानंतर भूषण पाटीलसोबत अभिषेक बलकवडे याने ड्रग्सचे प्लांट नाशिक येथे उभारलं आणि ड्रग्सची निर्मिती केली. मात्र बनवला तरी विकणार कुठे, म्हणून रिहान अन्सारीकडे ही जबाबदारी दिली गेली होती. नाशिक येथून रहीम ड्रग्स राज्यभरात पोचवत असायचा, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed