• Mon. Nov 25th, 2024
    धरणावर अवैधरित्या चोरलेली वाळू, सरकारी अभियंत्यांना दणका, तब्बल ९ कोटींचा दंड

    जळगाव: जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या आठ दरवाज्यांच्या कामासाठी अवैधरीत्या चोरलेली वाळू आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी चार हजार ब्रास अवैध वाळू साठा केल्याप्रकरणी समाधानकारक खुलासा व कागदपत्रे सादर न केल्याने जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंत्यांना ९ कोटी ३६ लाख ९१ हजार १८० रुपये दंड भरण्याची नोटीस तहसीलदार निता लबडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे.
    दादांच्या बालेकिल्ल्यात जाऊन बावनकुळेंनी ठणकावून सांगितलं, बारामतीची जागा १०० टक्के जिंकणारहतनूर धरणावरील नवीन आठ दरवाज्यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू साठा करण्यात आल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वरणगाव मंडळांधिकाऱ्यांनी सुमारे पाच हजार ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा केला होता. अहवाल तहसीलदारांना आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नोटीसीद्वारे साठ्याबाबत विचारणा केल्यानंतर २११२ ब्रास वाळूबाबत ९० छायांकित प्रत (परमीट) सादर करण्यात आल्या. हतनूर धरणावर ४०९३.६३ ब्रास वाळू साठा आढळला. मात्र, गुजरात राज्यातून आणलेल्या वाळूसोबत ईटीपी पास नसल्याने या परवान्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली व संबंधितांनी नियमांचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने दंडात्मक नोटीस बजावण्यात आली.

    अजितदादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, देवेंद्र फडणवीसांचं विधान; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

    वाळूबाबत गुजरात राज्याचा खनिकर्म विभागाचा परवाना नव्हता, झिरो रॉयल्टी सादर करण्यात आलेली नाही. कोणत्या वाहनांद्वारे वाळू आणण्याची परवानगी मिळाली. त्या वाहनांचे डिटेल्स मिळाले नाहीत. त्यामुळे महाखनिज प्रणालीवर पडताळणी करता आली नसल्याने साठा करण्यात आलेला वाळू साठा हा अवैध असल्याचे स्पष्ट असल्याचे तहसीलदार निता लबडे यांनी नोटीसीत म्हटले आहे. ४०९४ ब्रासचा अवैधरीत्या साठा केल्याप्रकरणी बाजारभाव रक्कम व रॉयल्टी मिळून ९ कोटी ३६ लाख ९१ हजार १९० रुपये दंडाची नोटीस कार्यकारी अभियंता जळगाव मध्यम प्रकल्प दोन यांना तहसीलदार लबडे यांनी बजावल्याने शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *