पुणे येथील गहुंजे मैदान येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ चे पाच सामने होणार आहेत. त्या सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. त्यानुसार पीएमपीकडून क्रिकेट शौकिनांना गहुंजे मैदान येथे येण्या-जाण्याच्या सोयीसाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकावरून जादा बसचे नियोजन करण्यात येईल. मनपा व निगडी बायपास येथून प्रतिव्यक्ती १०० रुपये तिकीट दर असणार आहे. क्रिकेट सामने संपल्यानंतर परत येण्यासाठी तेथून बस असणार आहेत.
डे नाईट सामने व बस सुटण्याचे वेळा
गहुंजे मैदानावरील पाचपैकी चार सामने हे डे-नाईट होणार आहे. १९, ३० ऑक्टोबर, एक आणि आठ नोव्हेंबर या तारखेला हे सामने असणार आहेत. त्या दिवशी पुणे मनपा भवन येथील सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेला बस सुटतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ११ आणि साडेअकरा वाजता बस सुटेल. तर, निगडी टिळक चौकातून दुपारी १२ आणि साडेबारा वाजता बस सुटणार आहे.
दिवसा सामन्याची तारीख व बस सुटण्याचे वेळा
विश्वचषकातील गहुंजे येथे ११ नोव्हेंबर रोजी एकमेव सामना दिवसा होणार आहे. या सामन्यांसाठी मनपा भवन येथून सकाळी८.२५, ८.५०, ९.०५ अशा तीन बस सोडण्यात येणार आहेत. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ८.१५ व ८.३५ या दोन बस असतील. निगडी टिळक चौकातून सकाळी साडेआठ व नऊ वाजता बस सुटणार आहे.
Read Latest Pune News and Marathi News