त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून शासनाचा निषेध करण्यात आला. महामंडळ स्थापन करण्याची मागणी तात्काळ मान्य करावी असा उल्लेख असलेले निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
महाराष्ट्र ब्राह्मण समाजाचा मोर्चा सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वंदेमातरम् सभागृहापासून सुरु झाला. अण्णाभाऊ साठे चौक मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर आला. या ठिकाणी छोटेखानी सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. मोर्चामध्ये महिला – पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे,अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक सचिन वाडे पाटील, परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी, यजुर्वेदी संघाचे संस्थापक लक्ष्मीकांत दडके, विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर.बी. शर्मा, ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष मिलींद दामोदरे, ब्राम्हण समाज पुणे येथील सुधाकर पुराणिक, छत्रपती संभाजीनगर येथील गीता आचार्य, विजया अवस्थी यांनी केले.