• Mon. Nov 25th, 2024
    अज्ञात दुचाकीवरून आले; रॉडने हल्ला करत जिवंत जाळलं, शिक्षकाचा दुर्दैवी अंत, कारण काय?

    वाशिम: मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे जि. प. शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनवणे यांना मालेगाव-आमखेडा रोडवर कोल्ही गावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी रॉडने मारून आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
    आधी बेदम मारहाण; नंतर अंगावर दगड टाकून हाडांचा चुरा, घटनेनं खळबळ, धुळ्यात नेमकं काय घडलं?
    मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मुळचे रिसोड तालुक्यातील बालखेडचे रहिवाशी असून बोरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटना घडल्यानंतर त्यांना सुरवातीला मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणि नंतर वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैयक्तिक वादातून त्यांची हत्या केल्याची चर्चा असून हल्लेखोर फरार झाले आहेत. पेट्रोल टाकून जाळल्यानंतर सोनवणे अर्धा तास रस्त्याच्या कडेला तडफडत होते. भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.

    तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुप्रिया सुळे गरजल्या

    घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली असून जऊळका पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी जऊळका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार राठोड हे अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनकडून विविध टीम गठीत करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, या आधीही दिलीप धोंडूजी सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा ते बचावले होते. मात्र यावेळी दैवाने त्यांना साथ दिली नाही. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यात भर दिवसा झालेल्या ह्या हल्ल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *