• Thu. Mar 12th, 2026
    मुलींचा विनयभंग करायचा, देवासमोर जाऊन डोकं आपटायचा, विकृताला नागपूर पोलिसांच्या बेड्या

    नागपूर : अश्लिल हावभाव करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश भोजराज यादव (वय 32, रा. आंबेडकर कॉलनी, इंदोरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मानसिक आजार असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी धांतोली परीसरात १४ वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना आरोपीने आपण करिअर बॉय असल्याचं सांगत अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. बळजबरीने तिचा हात धरून तिची छेड काढत विनयभंग सुरू केला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर मुलीने कुटुंबियांच्या मदतीने आरोपी विरूद्ध धंतोली पोलिसात तक्रार करण्यात आली. धंतोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

    अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाच्या आणाभाका, अश्लील व्हिडिओ काढत समाजमाध्यमांवर व्हायरल
    आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल

    पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपीला लोकमत चौकातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने छेडछाड केल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर प्रतापनगर, सीताबर्डी, कोतवाली, गिट्टीखदान पोलीस ठाण्यात यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर प्रतापनगर येथील एका प्रकरणात त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. विकृत मानसिकतेचा शैलेश अल्पवयीन मुलींना एकटे पाहून त्यांची छेड काढू लागला. धंतोलीचे पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, एपीआय संकेत चौधरी, पीएसआय वैभव भगत व पथकाने ही कारवाई केली.

    “डॉन को पकडना मुश्किल नही ….” म्हणत पोलिस अधिकाऱ्याला चॅलेंज दिलं अन् करेक्ट कार्यक्रम झाला, आरोपीला बेड्या
    मंदिरात जाऊन डोके आपटतो

    आरोपी मुलींना पाहून वेडा होतो, त्यानंतर तो अल्पवयीन मुली जवळ आल्यावर अश्लील हावभाव करू लागतो. अनेकवेळा त्याने मंदिरात जाऊन देवासमोर डोके आपटल्याच्या कथाही समोर आल्या आहेत. अशा प्रकारचे अनेक कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

    हिंगोलीत पीकविमा कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; धडा शिकवत पोलिसात गुन्हा दाखल

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed