• Mon. Nov 25th, 2024
    लोकसभा निवडणुकीपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही यासाठी…  बावनकुळेंचा अजब सल्ला

    अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. काल ते नगरला आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या अभियानाची कार्यशाळा घेतली. यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात बातम्या येऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यायची, यासंबंधी बोलताना धक्कादायक सल्ला दिला. ‘पत्रकारांना दर महिन्याला चहाला बोलवा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा,’ असा सल्लाच बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘पत्रकारांना दर महिन्याला चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,’ असे सांगायलाही बावनकुळे विसरले नाहीत.

    बावनकुळे यांची उपस्थितीत या अभियानाची कार्यशाळा झाली. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

    अभियानाची माहिती देताना त्याच्या प्रसिद्धीवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. हे बोलत असताना त्यांचा तोल सुटला. बुथ लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांनी त्या भागातील पत्रकारांशी चांगले संबंध ठेवावेत, असे सांगताना अप्रत्यक्षपणे पत्रकारांना मॅनेज करण्याचा सल्लाच बावनकुळे यांनी दिला.

    दादांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले…
    ते म्हणाले, २०२४ ची लोकसभा निवडणूक होऊपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या या अभियानाच्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ज्या बुथवर काम करतो, तेथील सर्व पत्रकारांची माहिती मिळवा. त्या भागातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, स्वत:चे पोर्टल चालविणारे पत्रकार हेही पहावेत. आपण एवढे चांगले करीत असताना ते जणू बॉम्बस्फोट झाल्यासारखी बातमी देतात. त्यामुळे आपल्या बुथच्या हद्दीत जे कोणी चार-पाच पत्रकार असतील त्यांची यादी तयार करा. त्यात सगळ्या मीडियाचे येतील असे पहावे. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यालया बोलवा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय करायचे ते सनजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झाले तर मदतीला खासदार विखे पाटील आहेतच, असेही बावनकुळे म्हणाले.

    खरंच नुकसानग्रस्तांवर अरेरावी केली? रागाने हात ओढला? फडणवीसांच्या VIRAL VIDEO वर भाजपचं स्पष्टीकरण
    चंद्रशेखर बावनकुळेंनी माफी मागा : सुप्रिया सुळे

    विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

    ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

    अजित पवारांवरील टीकेने वाद, बावनकुळेंनी पडळकरांना सुनावलं, अजितदादांची माफी मागितली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed