छत्रपती संभाजीनगर: प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निजर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीचे पडसाद प्रत्येक क्षेत्रावर उमटत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील शिक्षण व नोकरीसाठी दोन तरुण आणि दोन तरुणी असे चार जण कॅनडामध्ये टोरंटो व इतर शहरांमध्ये आहेत. यामुळे या मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निजर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी व्हिसा बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कॅनडामध्ये असलेल्या भारतीय तरुण-तरुणींच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन तरुणी व दोन तरुण हे नोकरी आणि शैक्षणिक कामानिमित्त कॅनेडात वास्तव्यास आहे.

शहरातील उल्कानगरी परिसरामध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, आमचा सध्या मुलांशी संपर्क होत आहे. या परिस्थितीमध्ये मुलं तिथे असल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे. मात्र मुलांनी दिलेल्या माहितीनुसार राजकीय तणावाच्या परिस्थितीचा परिणाम शिक्षण अथवा नोकरीच्या ठिकाणी अद्याप तरी दिसून येत नाही. सध्या हे चारही तरुण एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच भारतातील वेगवेगळ्या शहरातील तरुण-तरुणी देखील एकमेकांच्या संपर्कात असून सध्या तरी त्यांना कोणतीही अडचण नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील या चारही तरुणांचे पालक मुलांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणार आहेत. यामुळे सदर विद्यार्थ्यांना प्रशासन कशी मदत कर,ते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.