• Tue. Aug 11th, 2026

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

    ByMH LIVE NEWS

    Sep 20, 2023
    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

    मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

    खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, कारागीर व बलुतेदारांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागिरांच्या जीवनमानामध्ये अमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे मुख्य ध्येय असून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 21 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

    ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

    फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

    यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

     

    महात्मा गांधी विद्यालय नूतनीकरण आणि डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारणीचा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून आढावा – महासंवाद
    महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed