• Sun. Sep 22nd, 2024
तरुण सकाळी पाणी सोडायला गेला; अन् अनर्थ घडला, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

सिंधुदुर्ग: मालवण तालुक्यातील चौके-गोड्याचीवाडी येथील व्यावसायिक राजकमल वामन गावडे (३६) या युवकावर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काळाने घाला घातला आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करण्यासाठी गेला असता अचानक वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज घडली आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे.
जेवण करत होते; अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, अन् हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त, लेकरं झाली पोरकी
चौके-गोड्याचीवाडी येथे वराहपालनाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक राजकमल वामन गावडे हा आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास चहापाणी करुन घरापासून काहीशा अंतरावर असलेल्या वराहपालन शेडमध्ये पाणी सोडायला गेला. मात्र पंपाने पाणी येत नसल्याने शेडच्या मागे पंपाच्या तुटलेल्या वायरला जोडताना त्याला जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारपर्यंत राजकमल घरी न आल्याने त्याच्या फोनवर पत्नीचे वारंवार फोन केले. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या घरात वृध्द वडील, राजकमल यांचा तीन वर्षाचा मुलगा आणि पत्नी चार महिन्यांनी गरोदर होती. राजकमल घरी न आल्याने अखेर पत्नी ३.३० वाजता शोधण्यासाठी गेली असता राजकमल उलटा पडलेला दिसला.

शिवसेनेच्या लोकांची बेकायदाशीर बांधकामं, मंत्री रवींद्र चव्हाणांसमोरच भाजप आमदाराचा शिंदेंवर निशाणा!

राजकमलला उठवायला गेलेल्या पत्नीलाही विजेचा धक्का लागला. मात्र सुदैवाने ती वाचली. यानंतर सदर घटना घरी येत सांगताच वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत चालू विद्युत पुरवठा बंद केला. यानंतर पोलीस पाटील राजू गावडे यांना कल्पना दिली. पोलीस पाटील यांनी मालवण पोलीस ठाणे यांना माहिती दिली. मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, सुभाष शिवगण, अजय येरम, डी. व्ही. जानकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन तपास करत आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी यांच्यासह, चौके सरपंच गोपाळ चौकेकर, राजा गावडे, संतोष गावडे, पापा मांडलकर तसेच गोड्याचीवाडी ग्रामस्थ, चाकरमानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने ऐन चतुर्थी सणाला अवघा दोन दिवस असताना चौके गोड्याचीवाडी परिसर शोकाकूल झाला. आज सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed