• Fri. Jul 3rd, 2026

    “एैस पैस गप्पा नीलमताईंशी” या पुस्तकाचे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

    ByMH LIVE NEWS

    Sep 12, 2023
    “एैस पैस गप्पा नीलमताईंशी” या पुस्तकाचे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

    मुंबई, दि. 12 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या राजकारण व महिलांचे प्रश्न या क्षेत्रांबरोबर एक लेखिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. बुधवार १३ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते “एैस पैस गप्पा नीलमताईंशी” या पुस्तकाचे राजहंस प्रकाशन,पुणे या संस्थेद्वारे प्रकाशन करण्यात येणार आहे.

    या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लेखक सदानंद मोरे, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या श्रीमती करुणा गोखले, सहभागी होणार आहेत.

    कार्यक्रमाचे संयोजन शीतल म्हात्रे, अंजली कुलकर्णी, जेहलम जोशी, सुनीता मोरे यांनी केले आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed