जलसाठ्याअभावी ठेकाच नाही
जिल्ह्यातील ५०० हेक्टरखालील ५५ पैकी १४ तलावांचा जलसाठ्याअभावी ठेकाच देता आला नाही. उर्वरित तलावांचा ठेका सहकारी संस्था आणि खासगी संस्थांना दिला गेला असला, तरी मत्स्यबीज संचयन हंगामातच अनुकूल पाणी पातळी संबंधित तलावांत उपलब्ध न झाल्यामुळे ठेकेदारांना मत्स्यबीज संचयन करता येऊ शकलेले नाही. त्यामुळे त्यांचा मत्स्यबीज संचयन हंगाम वाया गेल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनावर होणार आहे. सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, सटाणा, दिंडोरी या भागातील तलावांतील मत्स्य व्यवसाय अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे बाधित झाला आहे.
जिल्ह्यातील कोरडे तलाव
तिसगाव, राहुड, तळवडे, भामेर, धनेर, धोटाने, दातली, खिर्डीसाठे, दुसिंगवाडी, सावरगाव, सातमाने, डोंगरगाव, चिंच, नागासाक्या, माणिकपुंज.
ठेका न दिलेले तलाव
धनेर, वडाळी, धोटाणे, दुसिंगवाडी, सावरगाव, भाम, सातमाने, पालखेड, शिरसगाव, रौळस पिंपरी.
जिल्ह्यातील धरणांत आढळणाऱ्या माशांच्या जाती
मरळ, टेंग्रा, तिलापिया,चंदेऱ्या, गवत्या, सिंघी, सायप्रिनस, मृगळ, कटला, रोहू, राममळेस, पिलवा, काडक, मुरा, भडके, डोख, झिंगा, ढेबऱ्या, वामढीस.
ऐन मत्स्यबीज संचयन हंगामात अनुकूल पाणी पातळी उपलब्ध होऊ न शकल्याने यावर्षीचे मत्स्यबीज संचयन प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे तलाव ठेके सुरू असलेल्या तलावांतून अपेक्षित मत्स्य उत्पादन होऊ शकणार नाही.-प्रणिता चांदे, प्रादेशिक उपायुक्त, मत्स्य व्यवसाय, नाशिक विभाग
जिल्ह्यातील तलाव ठेका स्थिती
हेक्टर—तलाव संख्या—सहकारी संस्थांना ठेका दिलेले—खासगी—ठेका दिलेले एकूण तलाव—ठेका न दिलेले तलाव संख्या—प्राप्त महसूल (रुपये)
० ते ५०० हेक्टर—५५—२३—१८—४१—१४—७०१५१६
५०० ते १००० हेक्टर—४—४—०—४—०—-२५५५०५
१००० हेक्टरवरील—६—४—२—६—०—६८६०००
एकूण—६५—३१—२०—५१—१४—१६४३०२१