२८ ऑगस्ट रोजी मोहम्मद जियान मोहम्मद इरफान हा घरात खेळताना गरम दुधाच्या कढाईत पडला होता. जियान या अपघातात मोठ्या प्रमाणावर भाजला होता. छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. पैठण पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मामाच्या घरी आलेला दोन वर्षाचा चिमुकला खेळताना गरम दुधाच्या पातेल्यात पडून मृत्यू झाला. ही घटना पैठण शहरातील नेहरू चौक येथील संजरपुरा येथे घडली. मुलावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालावली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आङे.
मोहम्मद जियान मोहम्मद इरफान रा. मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण शहरातील नेहरू चौक संजरपुरा येथील रहिवासी बब्बु शमी यांची मुलगी नाशिक येथील मालेगाव येथ मोहम्मद जियान यांच्या सोबत आला. दरम्यान सोमवार २८ तारखेला सकाळी अब्बु कटयारे यांचा नातू मोहम्मद जियान आहे. हा आपल्या आईसोबत आला होता.
दरम्यान सकाळी खेळत असताना तो गरम करण्यासाठी ठेवलेल्या दुधाच्या कढईमध्ये तो पडला. यामध्ये तो गंभीर भाजला गेला होता. तर मग त्याला तात्काळ रुग्णाला दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.