• Sat. Sep 21st, 2024
जालना लाठीहल्ला प्रकरण; चंद्रकांत पाटील भूमिका घेणार आहेत की नाही? संभाजी ब्रिगेडचा सवाल

पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मराठा समन्वय समितीची” स्थापना केली होती. मराठा समाजाचे प्रश्न लोकांकडून समजून घेत, त्याची मांडणी सरकार पुढे करण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षपदी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असल्याने संभाजी ब्रिगेडने काल झालेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्जबाबत कुठे आहेत चंद्रकांत दादा, असा सवाल केला आहे.
चंद्रकांत पाटलांची ही कृती मराठा आंदोलकांच्या संतापात अधिक भर टाकेल; आरक्षणाचा प्रश्न विचारताच…
जालना जिल्हात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांवर लाठीचार्ज करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्जमुळे मोठ्या संख्येने आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मराठा समाजाचे संघटक आक्रमक झाले आहेत. याच संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या समन्वयकांनी मराठा समाजासाठी समन्वयक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील कुठे गेले आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध, सरपंचानं भर रस्त्यात स्वतःची कार पेटवली

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले, जबाबदार सरकारचे मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात पण कुठे आहेत ते? चंद्रकांत दादा या बाबत काही भूमिका घेणार आहेत की नाही? न्यायालयामध्ये विषय प्रलंबित असताना आंदोलन का होत आहे? सरकार न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा करत आहे का नाही? जर सरकार पाठवपुरावा करत असेल तर आंदोलन उपोषण का होत आहेत? सरकार आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही. त्यांना निवळ जाती-जातीमध्ये समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आहे, असा थेट वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed