जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेले ३ तरुण भाविक गिरणा तापी नदीच्या संगमावर बुडाले असून दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
सागर शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष शिंपी तिन्ही रा. एरंडोल अशी बुडालेल्या तीनही मुलांची नावे आहेत. हे तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याची माहिती ही समोर येत आहे. श्रावण सोमवार असल्याने हे तिघेही तरुण महादेवाच्या जळगावातील प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात असलेल्या कावड यात्रेत सहभागी झाले होते.

या ठिकाणी ते संगमावर गेल्यानंतर नेमके कसे बुडाले या बाबतची माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एसडीआरएफटीम घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तीन तरुणांचा शोध सुरू आहे. तीनही तरुण हे एरंडोल शहरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
बुडालेल्या तीनही मुलांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली असून मुलांचा शोध सुरू आहे. या पैकी २ मुलाचा शोध लागला असून त्यांच्या मृतदेह सापडले आहेत तर इतर एकाचा शोध सुरू आहे.