• Sat. Sep 21st, 2024

मराठवाड्यात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, ७ महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर

मराठवाड्यात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, ७ महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र रोखण्यास शासनाला यश मिळाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर विभागीय आयुक्तालयातून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या सात महिन्यात तब्बल ५८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. परंतू असे असतानाही आत्महत्या रोखण्यास पुर्णत:ह यश आले नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टीने फटका दिला. लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. शासनाने घोषित केल्या प्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. तर ऑगस्ट महिना निम्मा उलटून गेला तरीही सर्वदूर पाऊस नसल्याने खरीप पिके अडचणीत सापडले आहे. मराठवाड्यात ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून त्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान तर कधी शेतमालास भाव नाही, या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न पडतो. या व इतर कारणांमुळे अडचणीत साडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याचे समोर येत आहे.

जुलै या एकाच महिन्यात विभागातील १०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. यात सर्वाधिक २७ आत्महत्येच्या घटना बीड जिल्ह्यातील आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यासह परभणी जिल्ह्यात १३, धाराशिव १२, नांदेड १०, जालना ९, हिंगोली ३ तर लातूर जिल्ह्यात एक घटना घडल्याचे समोर आले. तर गेल्या सात महिन्यात तब्बल ५८४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याचे समोर येत आहे
शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात
शेतकरी आत्महत्या –
जिल्हानिहाय आकडेवारी ( जानेवारी ते जुलै २०२३)

जिल्हा – शेतकरी आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर – ८६
जालना – ३६
परभणी – ५१
हिंगोली – २०
नांदेड – ९९
बीड – १५५
लातूर – ३५
धाराशिव – १०२
एकूण – ५८४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed