उस्मानाबाद,दि.15(जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी – कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महसूल विभागातील उत्कृष्ट तहसिलदार प्रवीण पांडे,उत्कृष्ट अव्वल कारकून ज्योतीराम देवकर, उत्कृष्ट महसूल सहाय्यक भावना पवार,उत्कृष्ट मंडळ अधिकारी प्रणिता गोरे, उत्कृष्ट शिपाई परशुराम गोरे यांचा पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यामध्ये ग्रीन लँड पब्लिक स्कूलचे गिरीश धोंगडे,ऋतुराज बागल, सार्थक अजमेरा,अथर्व देशमुख आणि सविता धर्मे,श्रीपतराव भोसले माध्यमिक विद्यालयातील सारंग बेलदार,छत्रपती शिवाजी हायस्कूलचे आर्यन सुर्यवंशी,श्री.श्री.रविशंकर विद्यामंदिरमधील अस्मिता बारकुल-पाटील आदींना सन्मानीत करण्यात आले.
0000