तरुणी बेपत्ता असताना पोलिसांकडून कुटुंबियांना सहकार्य मिळालं नाही, याअगोदर तीन वेळा आरोपीविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्यांनं दखल घेतली नाही, त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणानं काजलचा बळी गेला, असाही आरोप करण्यात आला होता.
नेमकं काय होतं प्रकरण?
काजल ही २७ जुलै रोजी रात्री शौचालयास जाते म्हणून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अखेर कुटुंबीयांनी ती बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात दाखल केली. पातुर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. परंतु २९ जुलै रोजी पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात काजलचा मृतदेह सापडला.
काजलचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. आधी गळा आवळला आणि नंतर तिचे हात बांधून ठेवले, असं प्राथिमक वैद्यकीय अहवालात समोर आलं होतं. काजलच्या हत्येनंतर जिल्हाभरात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. ठिकठिकाणी सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात होता. तपासादरम्यान पातुर पोलिसांना गावातीलच गजानन बळकर याचे काजलच्या कुटुंबीयांसोबत वाद असल्याचे समोर आले. मग पोलिसांना गजाननवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेतले.