• Wed. Nov 27th, 2024

    हृदयद्रावक; आज आपला शेवटचा दिवस असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती, दोघांनी गमावला जीव

    हृदयद्रावक; आज आपला शेवटचा दिवस असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती, दोघांनी गमावला जीव

    नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेल्या दोन तरुण बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडलीय. यात एकाचा मृतदेह सोमवारी सापडला, तर दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली असून मंगळवारी दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला. आयुष ईश्वर सातपुडके (वय २२ वर्षे, भिवी, भिवापूर), निखिल मुकुंद भगत (वय २५ वर्षे, नाड, ता. भिवापूर) अशी मृत तरुणांची नावं आहेत.

    सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन तरुणांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ते तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. शेवटी पोहण्याच्या मोहापायी त्यांना जीव गमवावा लागला. मकरधोकडा तलावातील नगरपालिकेच्या पंप हाऊसजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. मृतक आयुष सातपुडके आणि त्याचा चुलत भाऊ तसेच मृतक निखिल भगत आणि अनिकेत कांबळे हे चौघे सोमवारी दुपारी मकरधोकडा तलाव परिसरात दुचाकीने फिरायला गेले होते.

    हिंडेनबर्गने पार बुडवले, एक गौप्यस्फोट आणि तीन अब्जाधीशांचे ₹ ८१,९७,०२,१८,००,००० नुकसान
    दरम्यान निखिल आणि आयुष दोघेही तलावाच्या काठावर कपडे काढून तलावात उतरले, मात्र त्या दोघांनाही पोहाता येत नव्हते. तसेच तलावात किती पाणी आहे हे न कळल्याने दोघेही खोल खड्ड्यात पडले. हा प्रकार काही अंतरावर असलेल्या अन्य दोन मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. यापूर्वी दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.

    यानंतर उमरेड पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच मकरधोकरा चौकीचे पोलिस कर्मचारी आणि उमरेड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने आयुषचा मृतदेह सापडला, मात्र अंधारामुळे निखिलचा पत्ता लागला नाही. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली असुन मंगळवारी दुसऱ्या तरुणाचा मृतदेह मिळून आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed