• Sat. Sep 21st, 2024

सुनील केदार यांना मोठा झटका, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती कोर्टाने उठवली

सुनील केदार यांना मोठा झटका, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती कोर्टाने उठवली

नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठाने दिलेली स्थगिती हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यामुळे माजी मंत्री सुनील केदार यांची अडचणीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ सालामध्ये १५२ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. या संदर्भात तो या प्रकरणातही मुख्य आरोपी आहे.

न्यायालयाने बंदी हटविली

हे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. मात्र आता न्यायालयाने ही बंदी हटवली आहे.

Netflix मध्ये आहे जबरदस्त नोकरी, या कामासाठी मिळणार ७.४ कोटी रुपये इतका पगार
१९९९ साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकाताममधल्या कपनीच्या शेअर्समध्ये गुणतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाचा कायदानुसार बँकेचे परवागी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे बँकत ठेवलेले शेतकऱ्याचे बँकेत ठेवलेले पैसेही बुडाले होते.

तर मुलींची शाळा बंद करून धुणीभांडी करायला पाठवू, उंबरे ग्रामस्थांची भूमिका, मुंबईतील आमदाराला पत्र
केदार यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्हा नोंदविल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण सुरू होते. या प्रकरणी अंतिम टप्प्यात खटला सुरु असताना, केदार यानी उच्च न्यायालयात धाव घेतली, आणि या संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती आणली होती. या स्थगितीविरोधात राज्य सरकार मुंबई उच्च न्यायलयाचा नागपूर खंडपीठाकडे गेले होते.

नागपूर हादरले, मित्रांबरोबर पीत बसला होता, वादानंतर मित्राने तरुणाचा निर्दयीपणे जीव घेतला
राज्यसरकारने उच्च न्यायलयाला ही स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. राज्यसरकारने केलेली मागणी न्यायलयाने मान्य करत ही स्थगिती उठवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed