• Mon. Nov 25th, 2024
    कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तपास करताच धक्कादायक माहिती समोर…

    कल्याण : ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. विकास माने असं पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव असून तो ठाणे पोलीस दलात कार्यरत आहे. विकासवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, विकास आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू असून पत्नीकडून वारंवार धमकी व दबाव टाकला जात असल्याने त्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

    या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे.

    Mumbai News : वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी थांबवली अन् थेट पुलावरून मारली उडी, हेलिकॉप्टरने शोध सुरू

    कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवरील शंकेश्वर कृपा इमारतीमध्ये विकास माने आपल्या कुटुंबासह राहतात. विकास माने हे ठाणे पोलीस दलात कार्यरत आहेत. आज सकाळच्या सुमारास विकास माने यांनी राहत्या घरात विष प्राषन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच विकासचे नातेवाईक आणि त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास व त्याच्या पत्नीचे वाद सुरू असून विकास यांना वारंवार धमकी व दबाव टाकला जात असल्याने त्याने आत्महत्याचे पाऊल उचलत आरोप विकास यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    अबब! बेडरुम, टॉयलेट अन् किचनमध्ये सापडली चक्क नागाच्या कोब्रा जातीची ५ विषारी पिल्लं, पुढे काय झालं वाचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed