• Sat. Sep 21st, 2024
महाराष्ट्रावरील पावसाचे ढग अजूनही कायम: पुढील ५ दिवसात मुंबईसह या भागांत मुसळधार बरसणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गेले दोन आठवडे सतत पडणारा पाऊस…ढगाळलेल्या आभाळामुळे मंदप्रकाशात चाचपडणारे मुंबईकर रविवारी पावसाने घेतलेल्या ‘सुट्टी’ने आणि सूर्यदर्शनाने सुखावले. सातत्याने दमट वातावरणामुळे अनेक आजारांशी लढा द्यावा लागत असल्याने मुंबईकर पाऊस उघडण्याची वाट पाहत होते. शनिवारी एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर अनुभवल्यानंतर रविवारचा दिवस मात्र तुलनेने कोरडा गेला. यामुळे तापमानातही लगचेच बदल जाणवायला सुरुवात झाली.

सांताक्रूझ येथे रविवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत ३ मिमी, तर कुलाबा येथे शून्य मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये मात्र सांताक्रूझ येथे २४.६, तर कुलाबा येथे १२.६ मिमी पाऊस नोंदला गेला. रविवारी पावसात घट झाल्याने सांताक्रूझ येथे २४ तासांमध्ये कमाल तापमान १ अंशाने वाढून ३०.६ अंश सेल्सिअस झाले, तर कुलाबा येथे २ अंशांनी २४ तासांत तापमान वाढ झाली. कुलाबा येथे ३०.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा नोंदला गेला. कोकणामध्ये शनिवारपासून अपेक्षेप्रमाणे पाऊस कमी झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी दिवसभरात रत्नागिरी केंद्रावर ३ मिमी पाऊस नोंदला गेला, तर डहाणू केंद्रावर ०.३ मिमी पावसाची नोंद झाली.

Sambhaji Bhide: गुन्हा दाखल होऊनही संभाजी भिडेंनी पुन्हा तेच केले, गांधीजींचा पुन्हा अवमान

कुठे, किती पाऊस कोसळणार?

भारतीय हवामान विभागाने रविवारी पाच दिवसांसाठी वर्तवलेल्या पावसाच्या शक्यतेनुसार, रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतील. तर बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. पालघर जिल्ह्यातही मंगळवारपर्यंत मध्यम सरींचीच शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरी पडू शकतात. ठाणे जिल्ह्यात आठवड्याची सुरुवात मध्यम सरींनी होऊन त्यानंतर मंगळवार ते गुरुवार या दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed