• Sat. Jun 6th, 2026
    पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसचा अपघात, एसटीने मागून दिली धडक, वाहनं चक्काचूर अन्…

    जळगाव : पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भुसावळ येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला ओव्हरटेक करताना एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चार जण गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले आहेत. बीड तालुक्यातील रौळसगावजवळ शनिवारी सकाळी हा अपघात झाला. सर्व जखमी भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील कोळी कुटुंब व त्यांचे नातेवाईक (एमएच १९ वाय ६१०२) या क्रमांकाच्या खाजगी मिनी बसने पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. यात जवळपास १७ प्रवासी होते. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रौळसगावजवळ जात असताना याच भाविकांच्या मिनी बसवरील चालकाचे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बसला मागून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एमएच १४ डीटी १९२९) धडक दिली. पाठीमागून धडक दिल्याने मिनी बस रस्त्याच्या खाली गेली. तसेच समोरील भागही चक्काचूर झाला. यात मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.

    खोलीचा दरवाजा आतून बंद म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं, भाच्याला पाहून मामाला धक्काच बसला…
    अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले तसेच महामार्ग पोलीस, नेकनूर पोलिस आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. पोलिस उपनिरीक्षक यशवंत घोडके, संजय खताळ, अनिल तांदळे, विलास ठोंबरे, सांगळे, जालिंदर सुरवसे, पह्राट यांच्यासह नेकनूर पोलिसांनी जखमींना मदत केली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. तसेच वाहतूकही सुरळीत केली. जखमींमध्ये चौघांची प्रकृती चिंताजनक असून, चौघांची स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    जखमींमध्ये नर्मदा एकनाथ कोळी (वय ६०), कैलास बोदडे (चालक), अश्विनी सपकाळे (वय २५), राजर्षी कोळी (१६) हे गंभीर जखमी आहेत. आशा कोळी (५०), सुरेखा कोळी (४०), मनीषा कोळी (४०), राहुल कोळी (३२) हे किरकोळ जखमी आहेत. हे सर्व जखमी भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या बीड व परिसरातील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.

    Crime Diary : ३ मिनिटं ३३ चोर अन् २ अब्ज ७० कोटींचे हिरे गायब, एअरपोर्टवर थरार; घटना वाचून हादराल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed