नागपूर : घरगुती वादातून भावाने आपल्या गतीमंद बहिणीचे जीवनच संपवून टाकले. ही धक्कादायक घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली आहे. खुशी किरण चौधरी ( वय ३८ वर्षे पडोळे नगर) असे मृत बहिणीचे नाव आहे. तर सूरज लक्ष्मणराव रक्षक (वय ४५ वर्षे) असे आरोपी भावाचे नाव आहे. दोघेही सख्खे बहीण भाऊ आहेत. या घटनेमुले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खुशीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र खुशी गतिमंद असल्याने तिचा पती तिला सोडून गेला. तेव्हापासून ती तिच्या भावासोबत राहत होती. सूरज हा मजूरीचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी गोंदियामध्ये खुशी ट्रेनमधून खाली पडली आणि तिचे दोन्ही पाय निकामी झाले. तसेच तिच्या पायात प्लास्टर होते. त्यामुळे सूरज तीची पूर्ण सेवा करत होता. तिला वेदनेमुळे खूप त्रास होत होता. तिला होणाऱ्या त्रासामुळे ती कळवळायची. ती आधीच गतीमंद होती आणि त्यामुळे तिचे सर्व काम तिच्या भावाला करावे लागत होते.

बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात सूरजने तिच्या तोंडावर लाथाभुक्क्याने मारायला सुरुवात केली. या मारहाणीमुळे खुशीच्या तोंडाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना. त्यावेळी सूरजचा सावत्र भाचा पियुष रक्षक (वय २६ वर्षे, वाठोडा) तेथे आला. तेव्हा सूरज खुशीला मारहाण करत होता.
सूरजच्या पुतण्याने विचारताच सूरज तिथून निघून गेला. पीयूष खुशीजवळ गेला असता खुशी तिथे बेशुद्ध होऊन पडली होती. त्यानंतच्या खुशीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सूरजचा पुतण्या पीयूष याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पीयूषच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात सूरजविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.