• Sat. Sep 21st, 2024
घरी परतताना काळाचा घाला; धुळ्यातील त्या अपघातात लेकांसमोर आईने श्वास सोडला

म. टा. वृत्तसेवा, धुळे : पळासनेर (ता. शिरपूर) गावात मुंबई-आग्रा महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कंटेनरने कार, पाच दुचाकी आणि दोन मालवाहू वाहनांना जोरदार धडक देत एका हॉटेलमध्ये शिरण्याबरोबच बसथांब्यावर जाऊन धडकला. या भीषण दुर्घटनेत ट्रकखाली चिरडून दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर धुळे जिल्हा व शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

गंभीर जखमींना धुळ्यातील हिरे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. कंटेनरखाली दबले गेल्याने मृतदेहांची ओळख पटविणेही अवघड झाले होते. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत नऊ मृतदेहांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. उर्वरित एकाचे धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांकडे मृतदेह सोपविण्यात आला. दरम्यान, महामार्गावर खडीचा मोठा थर साचल्याने काहीकाळ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Dhule Accident: चालकाचा ताबा सुटला, आठ वाहनांना धडक; असा झाला धुळ्यातील थरारक अपघात, Video
घटनास्थळी धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, विभागीय पोलिस अधीक्षक सचिन हिरे यांच्यासह शिरपूर तालुका, शिरपूर शहर, नरडाणा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी शर्मा यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील मृत व जखमींना शासनातर्फे योग्य मोबदला देण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती शासनाला कळविली आहे, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.

कुटुंबासोबतचा प्रवास ठरला अखेरचा!

धुळे शहरातील खंडेलवाल कुटुंबातील राजेंद्र पूनमचंद खंडेलवाल, पत्नी सुनीता राजेंद्र खंडेलवाल हे आपले दोन्ही मुले रजत व शुभमसह कार (एमएच १८ बीआर ५०७५) ने जयपूर येथून धुळ्याकडे येत असताना कंटेनरने सर्वप्रथम खंडेलवाल कुटुंबांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे कार महामार्गावर फेकली गेली. यात सुनीता खंडेलवाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीनही जण जखमी झाले.

अपघातातील मृतांची नावे

कन्हैयालाल बंजारा (कंटेनरचालक), सुरपालसिंग दिवानसिंग राजपूत (सहचालक, दोघे रा. जावदा, जि. चितोडगड, राजस्थान), प्रतापसिंग भिमसिंग गिरासे (वय ७०, पळासनेर, ता. शिरपूर), दशरथ कमल पावरा (वय २२, पळासनेर, ता. शिरपूर), गीता मुरी पावरा (वय १५), मुरी सुरसिंग पावरा (वय २८), संजय जायमय पावरा (वय ३८), रितेश संजय पावरा (वय १०, सर्व रा. कोळसापाणी, ता. शिरपूर), खिरमा डेबरा कनोजे (वय १०, आंबापाणी, ता. शिरपूर), सुनीता राजेश खंडेलवाल (देवपूर, धुळे).

Dhule Accident: आधी वाहनांना उडवलं, नंतर हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचा थरारक CCTV Footage
जखमींची नावे

या अपघातात १९ जण जखमी झाले असून, चौघांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित १५ जणांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये हॉटेलचालक बिजलान दारसिंग पावरा, दिनेश नारशा पावरा, गीता पावरा, ललिता रमेश पावरा, अनिता पावरा, दीपक पावरा, नंदिनी पावरा, अजय पावरा, सुमित्रा पावरा, अमरसिंग पावरा, अर्जुन पावरा (सर्व रा. कोळसापाणी, शिरपूर),Ḥ हेमराज जाधव (नाशिक) आदींचा समावेश आहे.

या वाहनांचे झाले नुकसान

कंटेनर (आरजे ०९ जीबी ९००१)ने वाहनांना दिली धडक. एमएच १८ बीएस ७६९२ हीरो होंडा मोटारसायकल, एमपी ११ एमच १६३५ हीरो होंडा डीलक्स मोटारसायकल, एमपी ४६ एमएफ ४२२१ हीरो होंडा स्प्लेंडर, एमएच १५ एएच १०७० मालवाहू पिकअप, एमएच ३९ आर ४६८७ हीरो होंडा डीलक्स मोटारसायकल, एमपी ११ टीआर बीजे ४३३२ नवीन स्कूल बस, नंबर नसलेली हीरो होंडा स्प्लेंडर, एमएच १८ बीआर ५०७५ ह्युंदाई कार

Dhule Accident: ब्रेक फेल होऊन भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरला, १० जणांचा जागीच चिरडून मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed