• Mon. Nov 25th, 2024

    एकेकाळच्या PAला गृहमंत्री केलं, राजकारण सेट करूनही वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली

    एकेकाळच्या PAला गृहमंत्री केलं, राजकारण सेट करूनही वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली

    पुणे : दिलीप वळसे पाटील… असा नेता ज्याला पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून राजकारण करणाऱ्यांमध्ये वळसे पाटलांचा समावेश व्हायचा. अजित दादांनाही डावलून पवारांनी दिलीप वळसे पाटीलांची महत्त्वाच्या पदी वर्णी लावली. पण अखेर वळसे पाटलांनीही पवारांची साथ सोडली. सावली झालेल्या नेत्यानेच अडचणीत आणल्याने पवारांच्या पदरी निराशा आली.

    १९८० मध्ये इंदिरा गांधीनी पुलोद सरकार बरखास्त केलं. त्यावेळी पवारांना विरोधी बाकावर बसावं लागलं. विरोधी पक्षनेते झाल्यावर पवारांकडे एक तरुण आला आणि नोकरीची मागणी केली. नोकरी मागायला आलेल्या तरुणाला पवारांनी पीए म्हणून सोबतीला घेतलं. हा पीए म्हणजे दिलीप वळसे पाटील. तेव्हापासून वळसे पाटील पवारांसोबत सावलीसारखेस वावरले. पण जवळपास पाच दशकं साथ देणाऱ्या पवारांची वळसे पाटीलांनी साथ सोडली.
    अजित पवारांचा खास माणूस म्हणतो, श्रीकृष्णाच्या भूमिकेत शरद पवार अन् अर्जुनाच्या भूमिकेत दादा, आम्ही कुठे जावं?
    > १९९० ला शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना विधानसभेच्या मैदानात उतरवत आमदार केलं
    > १९९५, १९९९ ला सलग विजयी, त्यानंतर आघाडी सरकारमध्ये मंत्री पदाची संधी
    > १९९९ ते २००९ सलग दहा वर्ष विविध खात्याच्या मंत्री पदाची संधी
    > २००९ ला विधानसभेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी
    > २०१९ ला सगल सातव्यांदा विजयी

    आम्हाला वाटलं शपथविधीला सुप्रियाताई असतील, न सांगताच सह्या घेतल्या; अजितदादांच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

    विधानसभेच्या अध्यक्षपदी अत्यंत विश्वासू माणसाची नेमणूक केली जाते. हाच विश्वास पवारांनी वळसे पाटलांवर दाखवला. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच कामगार मंत्री पदी संधी दिली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री पदाची संधी दिली. अजित दादांना डावलत पवारांनी वळसे पाटलांवर विश्वास दर्शवला.
    फडणवीस साहेब…शरद पवारांच्या नादात आपल्याच निष्ठावंतांची जिरणार नाही ना? भाजपमधील पत्र चर्चेत
    एकंदरीतच पवारांनी दिलीप वळसे पाटलांना सत्तेची किती पदं दिली याचा हिशोब लावता येणार नाही. रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा आणि बँक भीमाशंकर साखर कारखाना… अशा अनेक ठिकाणी दिलीप वळसे पाटलांना प्रतिनिधीत्व देण्याचं काम केलं. पवारांनी वळसे पाटलांना राजकीय संधी आणि सत्तेची पदं देण्यात कसीलही कसर सोडली नाही. तरीही वळसे पाटलांनी अजितदादांना साथ दिल्याने पवारांना धक्का बसलाय. आपल्या मर्जीतल्या माणसानेच अडचणी वाढवल्याने पवारांची निराशा झालीय. वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडायला हवी होती का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed