धुळे: धुळे शहरातील महिलेला अश्लील मेसेज करणाऱ्या रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. त्याला इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बाहेर काढत चोप देत आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नितीन सोमनाथ पाटील (३४) असे चोप दिलेल्या मॅनेजरचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मुझे प्यार हो गया” असा अश्लील मेसेज त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर मॅनेजर असलेल्या नितीन पाटीलने टाकला होता. याबाबत त्याला समज देऊनही त्याने अश्लील मेसेज पाठवने बंद न केल्याने पीडित महिलेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

त्यानंतर त्यांना घडलेली घटना कथन केली. संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील गल्ली नंबर सहा येथील रिलायन्स लाइफ इन्शुरन्स येथील कंपनीत जाऊन असिस्टंट ब्रांच मॅनेजरला चांगलाच चोप दिला आहे. यानंतर रिलायन्स लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या कार्यालयापासून ते आझाद नगर पोलीस स्टेशनपर्यंत असिस्टंट मॅनेजरला चोप देत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सदर मॅनेजरची दिंड काढली. रिलायन्सच्या कार्यालयापासून ते आझाद नगर पोलीस ठाण्यापर्यंत पायी नेत आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.