• Mon. Nov 25th, 2024

    दृश्य पाहून मुलींचा आरडाओरडा, जळगावच्या मुलीनं वसतिगृहात स्वतःला संपवलं, अकोल्यातील घटना

    दृश्य पाहून मुलींचा आरडाओरडा, जळगावच्या मुलीनं वसतिगृहात स्वतःला संपवलं, अकोल्यातील घटना

    अकोला : शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात एका १७ वर्षीय मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्या केलेली मुलगी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरची होती. विशेष म्हणजे एका पोलीस कर्मचाऱ्यांची ती मुलगी होती. तिच्या आत्महत्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेले नाही.काय आहे संपूर्ण घटना

    या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. शहरातील शास्त्रीनगर भागात मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने काल रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटने संदर्भात सिव्हिल लाइन पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं अन् तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, लक्ष्मीपार्वती चंद्रकांत बोदडे असं आत्महत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. ती जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरची होती. तिचे वडील चंद्रकांत बोदडे हे पोलीस दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे करीत आहेत. मुलीच्या आत्महत्येचं मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती, असे सांगण्यात येत आहे.
    डोक्यावर कर्जाचा बोजा, फेडणं अशक्य झालं; तरुणाने मित्रांना साथीला घेत केलं धक्कादायक कृत्य
    अशी समजली घटना

    रविरारी रात्री दहा वाजले तरीही लक्ष्मीपार्वती ही जेवणासाठी आली नाही. तिच्या मैत्रिणींनीही फोन करून तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्वयंपाक करणारी महिला आणि तिच्या मैत्रिणी तिला बोलवण्यासाठी तिच्या रूमवर पोहचल्या. पण तिच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. कित्येकदा दरवाजातून तिला हाक दिल्या तरीही त्यावर कुठलाही प्रतिसाद नव्हता. मग काही तरुणींनी खिडकीतून डोकावून पाहिलं. यावेळी तिने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. या घटनेनंतर वसतिगृहात प्रचंड आरडाओरडा झाला. वसतिगृहात देखरेख करणाऱ्या महिला या संदर्भात माहिती देण्यासाठी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजता दाखल झाल्या. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय खडसे ड्युटीवर होते. त्यांनी लागलीच वसतिगृहात भेट दिली.
    Crime News: आत्महत्या भासवत पत्नीचा गेम, पती अन् सासू-सासर्‍यांचा भयंकर कट; सुखी संसाराला असा लावला सुरूंग
    खोलीत प्रवेश करण्यासाठी तोडावी लागली खिडकी

    मुलीनं खोलीच्या दरवाजाच्या पाच फुटाच्या अंतरावर कडीकोंड्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडणं अशक्य होतं. यासाठी पोलिसांनी मजुरांना बोलावून रूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तिचा मृतदेह मध्यरात्रीनंतर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आला.

    प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन महिमामंडन करणं उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? | देवेंद्र फडणवीस

    हाताने होती अपंग, गेल्या काही दिवसांपासून…

    लक्ष्मीपार्वती ही हाताने अपंग होती. गेल्या १ मे रोजी मुलींच्या या वसतिगृहात दाखल झाली होती. पुढं चार ते पाच दिवस इथे राहिले. त्यानंतर ती पुण्याला आजीकडे राहायला गेली होती आणि तिथे तिने शिकवणी क्लास सुरू केले होते. आता पुन्हा ६ जूनपासून ती वसतिगृहात राहायला आली होती. इथे NEET परीक्षेसाठी शिकवणी क्लास सुरू केले. या वसतिगृहात एकत्रित सुमारे ३७ मुली आहेत. तिची रूम पार्टनर असलेली मुलगी तिच्या घरी लग्न समारंभ असल्यामुळे गेल्या सात दिवसांपासून गावी आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ‘ती’ गुमसुम असायची असे सांगण्यात आले. काल रात्री वसतिगृहात असं काय घडलं की तिला आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed