• Sat. Sep 21st, 2024

तुम्ही पित असलेली ब्रँडेड दारु बनावट तर नाही? संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघड

तुम्ही पित असलेली ब्रँडेड दारु बनावट तर नाही? संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघड

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : हलक्या प्रतीची दारू महागड्या दारूच्या बाटलींमध्ये टाकून, सीलबंद केली दारूच्या बाटल्यांची बाजारात विक्री करण्यासाठी जात असलेल्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. दादासाहेब पांडुरंग मुटकुळे (वय २३, रा. मुळ मांडवा, ता. आष्टी, जि. बीड, ह. मु. सिडको वाळुज महानगर) आणि दिनेश सखाराम धायडे (वय २६, रा. मु.पो. घाणेगाव, गंगापूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांकडून तब्बल १२ लाख रुपयांचा मुद्देमाल चार चाकी वाहनासह जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, उपायुक्त विजय पवार, जिल्ह्याचे अधीक्षक संतोष झगडे, प्रभारी उपअधीक्षक शरद फटांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे यांना बनावट दारू घेऊन संशयित येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून, नगर रोडवर भेंडाळा फाटा, भेंडाळा शिवार येथे काळ्या रंगाची कार शिंदे यांच्या पथकाने थांबविले. या कारची तपासणी केली असता, या कारमध्ये महागड्या दारूच्या बाटल्यांची १२ खोकी आढळली. मुटकुळेकडे चौकशी केली असता, घरामध्ये बाटलीत दुसरी दारू भरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या फ्लॅटवर छापा मारला असता, त्याच्या फ्लॅटमधून गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ९६ बाटल्या सापडल्या. या मुद्देमालाची कारसह किंमत १२ लाख ४७ हजार ६३२ रुपये आहे. या दोन्ही आरोपी विरोधात राज्य उत्पादन शुल्क ड विभाग येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास निरिक्षक शहाजी शिंदे हे करित आहेत.

ही कारवाई दुय्यम निरिक्षक एस. के. वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. गुंजाळे, आर. एल. बनकर, व्ही. एस. पवार, वाय. पी. घुनावट, एम. एच. बहुरे, व्ही. जी. चव्हाण यांनी केली.

बॅच नंबरवरून फुटले बिंग

भेंडाळा फाटा जवळ निरीक्षक शहाजी शिंदे यांनी कारमधुन महागड्या दारूच्या बाटल्या जप्त केले. या बाटल्याचे बॅच नंबरची शिंदे यांनी बारकाईने तपासणी केली असता, त्यांना प्रत्येक बाटलीचा बॅच नंबर वेगळा दिसला. याबाबत आरोपी दादासाहेब मुळकुटे याला विचारले असता, त्यांनी गोव्यातील दारू या बाटल्यांत टाकून याची विक्रीचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
फक्त ५० रुपये मागितले, नकार देताच चाकू काढला आणि छातीवर वार; पैशांतून करणार होता ही गोष्ट
असा करायचा होता व्यवसाय

दादासाहेब मुळकुटे आणि त्याचे साथीदार महागड्या व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्या विकत घेत. त्या बाटल्या स्वच्छ करून त्याच्यावरील लेबल दुरूस्त करून, त्याला गोव्यातील उपलब्ध असलेली दारू भरत होते. त्याची तंतोतंत सीलबंद पॅकिंग करून, विक्री करण्याचे नियोजन होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुळकूटे या दारूची विक्री कुठे करित होता? याच्याकडुन दारू घेणाऱ्या वॉईन शॉप आणि हॉटेल चालकांचा शोध तपासात घेणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed