• Thu. Jun 11th, 2026

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस

    ByMH LIVE NEWS

    Jun 15, 2023
    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात वाहतुकीत बदल

    सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १८ जून ते दि. २३ जून २०२३ या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दि. १८ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार आहे. त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करून दि. २३ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त जिल्ह्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed