• Wed. Sep 9th, 2026
दहावीच्या पोरांनी शाळेतच जय श्रीरामचे नारे दिले, सेंट लॉरेन्स शाळेने ६ मुलं जागेवर सस्पेंड केली

नवी मुंबई : राजकारणात सध्या हिंदुत्वाचा मुद्दा गाजत असताना आणि त्यावरुनच चर्चा झडत असताना वाशीमधील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने मुख्याध्यापिकांनी ६ मुलांना शाळेतून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

नवी मुंबईतील वाशी येथील सेंट लॉरेन्स या शाळेमध्ये सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान दहावीच्या नऊ ते दहा विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. ह्या घोषणा विद्यार्थ्यांनी बाथरूम मध्ये जाऊन दिल्या होत्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे सेंट लॉरेन्सच्या मुख्याध्यापिकांनी ६ विद्यार्थ्यांना काढून टाकल्याची धक्कादायक बाब विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार समजते आहे.

मॅच टाय झाली पण संचालक फुटला, रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांची सटकली, बंगल्यावर जाऊन थेट…
दहावीचे विद्यार्थी असल्यामुळे वर्ष वाया जाईल किंवा शाळेतून प्रॅक्टिकलचे मार्क मिळणार नाही ह्या भीतीपोटी मुले आणि पालक घाबरले आहेत. त्यामुळे ते मीडियाच्या समोर येत नाहीत.

सेंट लॉरेन्स शाळेत नऊ ते दहा विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. या घोषणा तेथील शिक्षकांच्या कानावर पडल्या. शालेय विद्यार्थ्यांनी अशा घोषणा देण्याचं कारण काय? बरं त्या घोषणा शाळेत का दिल्या गेल्या? याची चौकशी शिक्षकांनी केली.

वारकरी पंढरपूरला निघाले पण वाटेतच घात, दिंडीत रिक्षा घुसली, अनेक वारकरी जखमी
घोषणा देणाऱ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये प्रवेश दिला मात्र काही मुलांना काढून टाकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत. या संदर्भात सेंट लॉरेन्सच्या मुख्याध्यापिकांसोबत तसेच पालकांसोबत संपर्क केल्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed