• Sat. Sep 21st, 2024
पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सौरभने आपण भाजप कार्यकर्ते असल्याचा उल्लेख ट्विटरवरील बायोमध्ये केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खासदार शरद पवार यांच्याविरोधात ट्विट करत सौरभ पिंपळकर याने ‘तुमचा दाभोळकर करु” अशी धमकी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व इतर महत्त्वाच्या नेत्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सौरभ पिंपळकर हा अमरावती येथील गोपाल नगर परिसरात राहतो. त्याने ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार ‘मी भाजपचा कार्यकर्ता आहे, मी धर्मनिरपेक्ष असणाऱ्यांचा द्वेष करतो’ असे नमूद केले आहे.

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मनसे नेते वसंत मोरेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच!
मिळालेल्या माहितीनुसार सौरभ या अगोदरही काही गुन्हेगारी कारवायांमध्ये होता. त्यामध्ये प्रामुख्याने काही दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात तो मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर येत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या बॅनरमध्ये सौरभ पिंपळकर सरचिटणीस युवा मोर्चा साईनगर मंडळ असाही उल्लेख केल्याचा दिसून येत आहे.

Sharad Pawar Threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
यासंदर्भात खाजगी वाहिनीला माहिती देताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी म्हणाले की, ट्विटर वरून धमकी देण्यासंदर्भात आरोपी हा अमरावतीचा असल्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. आम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच्यावर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये अद्याप गुन्हा दाखल आहेत, याची माहिती घेऊन पुढील कारवाई करू.

राजकारणासाठी औरंगजेब ही भाजपची गरज, खासदार संजय राऊत यांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed