• Tue. Jun 9th, 2026

    श्रीलंकन नागरिकाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; मानकापूरमधील खळबळजनक घटना

    श्रीलंकन नागरिकाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; मानकापूरमधील खळबळजनक घटना

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीतील गोधनी रेल्वे परिसरात श्रीलंकेच्या ज्येष्ठ नागरिकाचा कुजलेल्यास्थितीत मृतदेह आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अरुणासलम सिवराजह (वय ७५), असे मृताचे नाव आहे.काय आहे प्रकरण?

    गोधनी रेल्वे परिसरातील खड्ड्यात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एका वृद्धाचा कुजलेल्यास्थितीत मृतदेह असल्याची माहिती एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने मानकापूर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच मानकापूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. खिशात आढळलेल्या पासपोर्टवरून मृतकाची ओळख पटली. मृतक हा निवृत्ती वेतनधारक असल्याचीही नोंद पासपोर्टमध्ये आहे. पासपोर्टच्या आधारे पोलिसांनी माहिती काढली असता अरुणासलम हे २१ मे रोजी विमानाने चेन्नईला आले. तेथून ते रेल्वेने वाराणसीकडे जात होते. गोधनी परिसरात रेल्वे थांबली. ते खाली उतरले. प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अथवा लुटपाट करून त्यांना रेल्वेतून ढकलण्यात आल्याचीही शक्यता आहे.

    नातेवाईकांचा रुसव्यावर तोडगा अन् लोकांचं हित एकाच लग्नपत्रिकेत; नवरदेवाची भन्नाट शक्कल

    पोलिसांनी याप्रकरणाची माहिती श्रीलंकन दुतावासाला दिली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आ

    Chandrapur News: हसता खेळता ग्रुप सेल्फी काढला, मोबाईल काठावर ठेवला अन् घात झाला! वर्धा नदीत 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 15 ते 20 वर्षांच्या मुलांच्या जाण्याने हळहळ
    मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन
    Jalgaon Accident: एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed