• Wed. Jul 29th, 2026
    भरधाव कारची बसला धडक, एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत; एका चिमुकलीचा समावेश

    चंद्रपूर : भरधाव वेगात असलेल्या एका कारचा आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कारने या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच करुण अंत झालाय.

    हा भीषण अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड – नागपूर मार्गावरील कान्पा गावाजवळ घडला. अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचा, तीन महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जेव्हा मृतकांना कारमधून बाहेर काढत होते, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

    मृतकांची नावे

    रोहन विजय राऊत ( वय ३० )

    रुषीकेश विजय राऊत ( वय २४ )

    गिता विजय राऊत ( वय ४५ )

    सुनिता रुपेश फेंडर ( वय ४० )

    प्रभा शेखर सोनवाने ( वय ३६ )

    यामीनी रूप फेंडर ( वय ९ )

    ऑस्ट्रेलियाला तगडा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज WTC फायनलमधून आऊट; टीम इंडियासाठी ठरलेला डोकेदुखी

    जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर – महासंवाद
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय लवकरच – महसूलमंत्री बावनकुळे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed