• Sat. Sep 21st, 2024

सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण, इंडिक टेल्सवर कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण, इंडिक टेल्सवर कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, सामाजिक संघटनांनी या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या सगळ्या प्रकाराचा निषेध करत राज्य सरकारनं या सगळ्या प्रकरणात भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत कठोर कारवाईची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला देखील गेलं होतं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाइटवर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची हयगय करणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत.
कोल्हापुरकरांचा थाटच न्यारा; विवाहसोहळ्यानंतर नवं दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, ज्योतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टीबाबत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
MS Dhoni : सर्वोत्तम संघ नसताना CSKने विजेतेपद मिळवले; धोनीच्या जेतेपदाची रियल स्टोरी अशी आहे
महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच ‘इंडिक टेल्स’ वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
Pune News: ‘PMO कार्यालयाचा तो अधिकारी’ पुण्यात गोपनीय मिशनवर, संशय येताच डॉ. विनय देव यांचं बिंग फुटलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed