• Sat. Sep 21st, 2024
Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंची ५ तास चौकशी, हे १५ प्रश्न विचारून CBI ने घेरलं…

मुंबई : कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या खंडणीच्या आरोपावरून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहेत. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशात आर्यन खान ड्रग प्रकरणी २५ कोटी रूपयांच्या कथित खंडणीच्या मागणीच्या चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सामील झाले. यासाठी शनिवारी ते केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कार्यालयात होते.अधिक माहितीनुसार, या प्रकरणावर वानखेडेंकडून चौकशीची ही पहिली फेरी होती. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न विचारले जाणार असल्याचं सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं. एक दिवस आधीच, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला वानखेडेंवर २२ मेपर्यंत कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे निर्देश दिले होते. पण या चौकशीमध्ये त्यांना कोणते प्रश्न विचारणार याची लिस्ट मात्र सध्या माध्यमांच्या हाती आली आहे. त्यानुसार कोणते १५ प्रश्न आहेत? पाहुयात…

प्लीज…बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने वानखेडेंना काय काय मेसेज केले? वाचा संपूर्ण चॅटिंग…
१) तुम्ही शाहरुख खानसोबत फोन कॉलवर किती वेळा बोललात?

२) या केससंबंधी तुम्ही शाहरुख खानला भेटलात का? आणि जर भेटलात तर किती वेळा भेटलात?

३) शाहरुख खानला मदत करण्यासाठी तुम्ही कसे बोलत होतात.

४) शाहरुख खान आणि तुमच्या चॅटिंगमध्ये शाहरुख खान तुम्हाला कोणत्या मदतीसाठी थँक्स बोलत आहे?

५) या प्रकरणात झालेल्या १८ कोटींच्या डीलसंबंधी तुमच्याकडे काय माहिती आहे? याबद्दल तुम्हाला काय माहिती?

६) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर तुम्ही का अटक केली होती?

७) आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीशी तुम्ही किती वेळा फोनवर बोलला होतात? आणि तुमच्यात काय बोलणं झालं होतं?

८) तुम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ७ वेळा परदेशात प्रवेश केला होता. या प्रवास तुम्ही कोणाच्या खर्चावर केला?

९) तुमची मालमत्ता तुमच्या पगारापेक्षाही जास्त आहे का? आणि जर असेल तर या मालमत्तांसाठी तुमच्याकडे कुठून पैसा आला?

१०) तुमच्याकडे लाखोंच्या किमतीची घड्याळं आहेत? ती कुठून आणली?

११) ५० लाखांमधील १२ लाख रुपये तुम्हाला दिल्याचा आरोप होत आहे, यावर तुम्ही काय बोलणार?

Dhirendra Shastri: …तर बागेश्वर बाबांना २ कोटींचे हिरे वाहीन, सुरतच्या व्यापाऱ्याचं ओपन चॅलेंज; धीरेंद्र शास्त्री दाखवणार का चमत्कार

१२) किरण गोसावी आणि प्रभाकर साईल हे ५० लाख रुपये घेण्यासाठी गेले होते. तेव्हा तुमच्याशीदेखील फोनवर बोलणं झाल्याचा आरोप होत आहे. यासंबंधी तुम्ही काय सांगाल…

१३) आर्यन खानच्या प्रकरणामध्ये २७ जणांची यादी होती. पण फक्त १० जणांनाच अटक करण्यात आली. बाकीच्यांना सोडण्याच्या बदल्यामध्ये तुम्ही पैसे घेतल्याचा आरोप होत आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नेमकं सत्य काय?

१४) आर्यन खानला अटक झाल्यानंतर पूजा ददलानीसोबत पैशांचा व्यवहार झाला होता. यामध्ये तुमचाही हात असल्याचा आरोप होत आहे. यावर तुम्ही काय सांगाल?

१५) तुम्ही सूचना दिल्यानंतरच पैशांचा करार केला असा आरोप किरण गोसावी यांनी केला आहे. या आरोपावर तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?

Aryan Khan Case- CBI ऑफिसला गेले समीर वानखेडे, आत जाण्यापूर्वी फक्त म्हणाले दोन शब्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed